वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने तोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू..
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताने वेस्ट इंडिजला 3 धावांनी पराभूत केलं.रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 57 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.
यादरम्यान त्याने विराट कोहलीचा एक विक्रम मोडला. श्रेयस अय्यरने त्याच्या पहिल्या 25 एकदिवसीय डावात 10 अर्धशतके आणि एका शतकासह 11वेळा 50+ धावा केल्या आहेत.
भारतीयांमध्ये, फक्त नवज्योत सिंग सिद्धूने पहिल्या 25 एकदिवसीय डावात अय्यरपेक्षा जास्त 50+ धावा केल्या होत्या. श्रेयसने 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
काही काळासाठी, तो संघातील क्रमांक 4 च्या भूमिकेसाठी परिपूर्ण खेळाडू म्हणून निवडला गेला. मात्र, वरिष्ठ खेळाडू संघात परत आल्याने त्यांना बहुतांश प्रसंगी बाहेर बसावे लागले.
Most 50+ scores for India in the first 25 ODI innings
12: Navjot Sidhu
11: Shreyas Iyer*
10: Virat Kohli
09: Shikhar Dhawan#ShreyasIyer— The Cricket Panda (@TheCricketPanda) July 22, 2022
याशिवाय अय्यरने शुक्रवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तो नवज्योतसिंग सिद्धूसह संयुक्त दुसरा सर्वात जलद भारतीय बनला आहे. दोघांनी 25 डावात हा पराक्रम केला आहे.

2023 एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघासाठी महत्त्वाचे खेळाडू
सध्या प्रत्येक संघ एकदिवशिय विश्वचषकासाठी संघ निवडत आहे. संघातील कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतोय हे पाहूनच भारतीय स्नाघ सुद्धा खेळाडूंना विश्वचषक संघाचा भाग बनवणार आहेत.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
म्हणुनच 2023 मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता अय्यर हा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.
अय्यर च्या कार्यपद्धतीत अजूनही सुधारणांची गरज आहे, परंतु त्या दिशेने ते काम करत असल्याचे त्यांने आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे. तो फिरकीपटूंविरुद्ध चांगला आहे आणि त्याच्यात मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे.
चौथ्या क्रमांकासाठी तो एक परिपूर्ण पर्याय असला तरीही संघात ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा सारखे खेळाडू या स्थानासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे अय्यरसाठी भारतीय संघात निवड होणे सोपं गणित असणार नाहीये.
अय्यरच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 38 डावांमध्ये 34.48 च्या सरासरीने 931 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने 7 विकेट गमावून 308 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार शिखर धवनच्या बॅटमधून सर्वाधिक 97 धावा झाल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 6 गडी गमावून 305 धावा करू शकला. दोन्ही देशांमधला पुढचा सामना आता 24 जुलै रोजी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे होणार आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..