IPL 2026: गेल्या चार हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन (Sanju Samson) आता पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जमध्ये व्यापाराच्या माध्यमातून सामील झाला आहे. संजू सॅमसनचे चेन्नई सुपर किंग्जशी संबंध असल्याच्या बातम्या पसरू लागल्यापासून, महेंद्रसिंग धोनीच्या जागी तो संघात सामील होईल अशी अटकळ बांधली जात होती.

त्याला फ्रँचायझीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करणार असल्याच्या बातम्या ही समोर आल्या होत्या. मात्र आता स्वतः फ्रेंचांयझीने याचे उत्तर दिले आहे.
Roar Ready, RutuRAJ! 🦁🌟#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/tUoUV3NUiU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 16, 2025
IPL 2026 साठी कोण असणार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार?
१५ नोव्हेंबर रोजी, इतर सर्व फ्रँचायझींसह, चेन्नई सुपर किंग्जने राखलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत संजू सॅमसनचे नाव देखील आहे. यासह, चेन्नई सुपर किंग्जने सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देखील दिले आहे.

ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२६ मध्ये फ्रँचायझीचा कर्णधार राहील. परिणामी, संजू सॅमसन फक्त एक खेळाडू म्हणून मैदानावर असेल. चेन्नई सुपर किंग्जने राजस्थानचे कर्णधारपद सोडलेल्या संजूला फक्त एक खेळाडू म्हणून जोडले आहे.
हेही वाचा:
केकेआरने सर्वाना केले आच्छर्यचकित, तबल एवढ्या खेळाडूंना रिलीज करत मिळवले 60+ करोड रु!
आरसीबीने कायम केलेल्या खेळाडूंची यादी समोर, तब्बल 8 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता , पहा यादी..!
6 thoughts on “IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!”