पटियालाच्या या राजाला स्वतः हिटलरनी कार गिफ्ट दिली होती… !

0

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पटियालाच्या या राजाला स्वतः हिटलरनी कार गिफ्ट दिली होती… !


 

हिटलर जर्मनीचा सर्वांत यशश्वी शासक. एक उतृष्ट शासक सोबतच एक अतिशय क्रूर राजा. हिटलरनी  राजकीय संबंध जोपासण्यावर जास्त भर दिला होता, मैत्रीच्या बाबतीत हिटलर कसा होता याचे अनुमान कुणीही नाही लावू शकत.हिटलरनी त्याच्या उभ्या आयुश्यात फक्त एकाच माणसाला गिफ्ट दिले होते. ते म्हणजे पटियालाचे महाराज भूपिंदर सिंह.

हिटलरनी स्वतः पटियालाचे राजे महाराज भूपिंदर सिंह याना त्यावेळेसची आलिशान गाडी गिफ्ट केली होती. त्यापूर्वी अथवा त्यांनतर  हिटलरनी अश्याप्रकारे कुणालाही गिफ्ट दिल्याची नोंद इतिहासात नाही.या गिफ्ट देण्यामागे हिटलरचा हेतू हा मैत्रीचा होता कि मग काही राजकीय फायद्यासाठी त्याने महाराज भूपिंदर सिंह यांना गाडी गिफ्ट दिली हे तर हिटलरला माहिती असावे.

पटियालाचे महाराज भूपिंदर सिंह जेव्हा जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा स्वतः हिटलरनी त्यांना त्या वेळेसची सर्वांत आलिशान कार मेबेच (maybach) गिफ्ट केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदर किंवा यांनतर हिटलरनी अश्या प्रकारे कुणालाही कोणतेही गिफ्ट दिले नव्हते.मग हिटलरनी फक्त याच राजाला का गिफ्ट दिले?
का हिटलर आणि राजा भूपिंदर सिंगची दोस्ती एवढी घट्ट होती?  का हिटलरणे राजकीय स्वार्थासाठी असं केल होत?

जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून…

पटियाला राज्याची स्थापना 1763साली झाली होती. हळूहळू ब्रिटिशांच्या मदतीने पटियाला साम्राज्य वाढत गेले आणि समोर 1857च्या क्रांतीदरम्यान इंग्रजांना सहकार्य केल्यामुळे पटियाला राज्य आजून मजबूत झाले.

पटियाला महाराज भूपिंदर सिंह यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर भूपिंदर सिंह 9 वर्षाचे असताना पटियाला राज्याचा कारभार त्यांच्या हातात आला. असं असलं तरी औपचारिकता म्हणून वय 18 वर्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते साम्राज्याचे राजे झाले. भूपिंदर सिंह राजनीतीणे परिपूर्ण होते.आणि एक उत्तम शासक होते, हेसुद्धा कारण समजलं जातं की यामुळे हिटलरनी त्यांना कार गिफ्ट दिली असावी.

हिटलर

जेव्हा महाराज भूपिंदर जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा हिटलरनी त्यांना भेटण्यासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला होता, पण प्रत्येक्षात मात्र त्यावेळी बोलत असताना हिटलर 5 नाही 10 नाही तर संपूर्ण 1 तास राजासोबत चर्चा करत बसला होता. राज्यकारभारा विषयी अनेक महत्वाचे विषय निघत असताना वेळ कसा गेला हे हिटलरला सुद्धा कळाले नाही.

आता बोलूया हिटलर नी गिफ्ट केलेल्या कारविषयी….

या आलिशान कारच वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला एक नाही दोन नाही तर तब्ब्ल बारा इंजिन होते.जिचा बॉनेटचे साईझ सुद्धा ईतर गाड्यांपेक्षा मोठे होते.पाच लोक आरामात बसू शकतील अशी गाडीची रचना होती. जर्मनीवरून जहाजाद्वारे ही कार पटियाला राज्याच्या महालात आणल्या गेली.

भूपिंदर सिंह राज्याच्या मृत्यूनंतर ही कार त्यांचे पुत्र यादवेंद्र सिंह यांच्या नावावर रजिस्टर झाली.आणि या गाडीला नंबर मिळाला सात. त्यानंतर ही गाडी अमेरिकेच्या एका प्रायव्हेट संग्रहकाणे पाच मिलियन डॉलरला विकत घेतली.

एवढयावरच या गाडीचा प्रवास न थांबता पुढे हीच गाडी एका मोठ्या लिलावात मोठ्या किमतीत विकल्या गेली. या गाडीची चर्चा एवढी होती कि जो तो या गाडीला पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी गर्दी करत असे. याच कारणामुळे
गाडीचा अनेक वेळा लिलाव झाला.

म्हटलं जात की हिटलरनी अश्या प्रकारे पहिल्यांदाच कुठल्याही राज्याला असं गिफ्ट दिलं होत. त्यानंतर हिटलरनी कुणालाही गिफ्ट दिले नाही….


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: कॉपी नाय राव शेअर करायचं..