केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..


 

धर्माच्या बाजूने राहणारांचा नेहमी विजय होत असतो. मग समोरचा व्यक्ती कितीही मोठा बलवान,ताकतवर असला आणि तो सत्याची बाजू सोडून अधर्माच्या संगतीत असेल तर त्याचा पराभव निच्छित असतो.

धर्म-अधर्माच्या युद्धामध्ये नेहमी धर्माचाच विजय होतो. आज आपण काही अश्याच महापराक्रमी योध्यांबद्दल बोलणार आहोत ,ज्यांच्यात आपल्या ताकतीच्या आणि शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याची ताकत होती. परंतु  केवळ अधर्माच्या बाजूने लढल्यामुळे या शूर योध्यांना रणभूमीत मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

सूर्यपुत्र कर्ण: महाभारतातील एक वीर आणि दानशूर योद्धा म्हणू कर्णाचा उल्लेख केला जातो. आपल्या मित्राच्या विजयासाठी हा योद्धा आपली सर्व ताकत लावून रणभूमीत उतरला होता. धनुर्धर अर्जुनाच्या तोडीस तोड शस्त्र ,अस्त्र ,युद्ध कौशल्य असतांना सुद्धा या योध्याला शेवटी रणभूमीत आपला जीव गमवावा लागला होता.

दुर्योधनाचा अत्यंत जवळचा व प्रिय मित्र असणारा कर्ण हा पराक्रमी योद्धा तर होताच  परंतु तो तेवढाच दानशूर सुद्धा होता. भीषण युद्धाच्या वेळी जेव्हा त्याला आपल्या कवच आणि कुंडलांची खऱ्या अर्थाने गरज होती, त्यावेळी सुद्धा त्याने आपल्या दानशूरतेच दर्शन घडवून दुसऱ्या रुपात आलेल्या इंद्रदेवांना कवच कुंडले दान दिली.

सुर्यपुत्र कर्ण आपल्या मैत्रीच्या धर्माचे पालन करत होता. त्यासाठीच तो दुर्योधनाकडून युद्ध करत होता. फक्त आपल्या मैत्रीधर्मासाठी कर्णाने युद्धात उतरून आपल्या प्राणाची आहुती दिली. अधर्मी दुर्योधनाच्या बाजूने  युद्धात उतरून शक्तिशाली कर्ण धारातीर्थी पडला.

भीष्म पितामहा: महाभारतातील सर्वांत महत्वाच्या पात्रांपैकी एक असलेले भीष्म पितामहा हे अत्यंत शक्तीशाली योद्धा होते. महाराजा शंतनू यांचे पुत्र असलेले भीष्म यांना इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.

त्यांनी शेवटपर्यंत हस्तनापूरच्या सिंहासनाची रक्षा करण्याची प्रतिज्ञा केली होती. युद्धाच्यावेळी इच्छा नसताना सुद्धा त्यांना पांडवांविरुध्द युध्द करावे लागले.

हस्तनापुरच्या सिंहासनाचा रक्षक या नात्याने त्यांनी कौरवांच्या बाजूने युद्धात सहभाग घेतला.  कौरवांचे पहिले सैनापती म्हणून भीष्म पितामहा यांनी सर्वाधिक १० दिवस युद्धाचे नेतृत्व केले. युद्धाच्या शेवटी त्यांनी गंगा नदीच्या किनारी इच्छा शक्ती मरण स्वीकारले होते.

भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रोपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा तेथे उपस्थित असतना सुद्धा त्यांनी कौरवांना थांबवले नाही.
गंगा किनारी जेव्हा भीष्म मृत्युच्या क्षणी त्यांनी त्यासाठी द्रोपदीची माफी सुद्धा मागितली होती.

 

महाबली कुंभकर्ण:

रामायाणातील शक्तिशाली राक्षस योद्ध्यांची नावे काढली तर महाबली कुंभकर्ण यांचे नाव सर्वांत अगोदर येईल.आपल्याआफाट ताकतीच्या जोरावर हा एकटा कुंभकर्ण  तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य बाळगून होता.

रामायाणातील धर्मयुद्धात जेव्हा रावणाने कुंभकर्णास युद्धासाठी झोपेतून उठवले. तेव्हा महाबली कुंभकर्णाने आपल्या मोठ्या  भावाला श्रीरामांच्या शरणात जाण्याची सूचना केली होती. परंतु अहंकारी रावनाने त्याचे ऐकले नाही. आणि कुंभकर्णाला युद्धात  राक्षसी सेनेचा  सेनापती म्हणू पाठवले.

आपल्या मोठ्या भावाच्या आदेशाचे पालन करत  आपण अधर्म करतोय हे जाणून सुद्धा कुंभकर्ण युद्धात सहभागी झाला आणी प्रभू श्री रामाच्या हातून मारला गेला.

फक्त अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळेच कुंभकर्ण सारखा महाबली सुद्धा युद्धभूमीत टिकू शकला नाही.  शेवटी विजय हा नेहमी धर्माच्या वाटेवर चालणारा आणि सत्याच्या बाजूने असणारांचाच होत असतो.


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top