नायक ‘जदुनाथ सिंह’ हा एकटा सैनिक पाकिस्तानी सैन्यावर भारी पडला होता..

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

नायक जदुनाथ सिंह हा एकटा सैनिक पाकिस्तानी सैन्यावर भारी पडला होता..


१९४७ मध्ये इंग्रज भारताला स्वतंत्र घोषित करून भारत सोडून गेले.परंतु जाता जाता  त्यांनी भारताचे भारत ,पाकीस्तान असे दोन तुकडे केले. भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची “नापाक” नजर स्वर्गापरी सुंदर असलेल्या काश्मीर वर होती. कित्तेक वेळा पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरवर हल्ला करण्याचा पर्यंत केला.

अशा परीस्तीतीमध्ये आपल्या देशाच्या अनेक शूर वीर शिपायांनी विरोधी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला,त्यांच्या अलौकिक शौर्यामुळेच कित्तेक वेळा पाकिस्तानला माघारी परतावे लागले. परंतु खेदाची बाब म्हणजे भारत मातेच्या सन्मानासाठी लढणारे अनेक देशभक्त शिपाई शहीद पण झाले . त्या  वीर पुत्रामध्ये एक नाव प्रामुख्याने येते ते म्हणजे नायक जदुनाथ सिंह.

या एकट्या शिपायाने अतिशय कमी मनुष्यबळ असलेल्या तुकडीचे अतिशय उत्तम रित्या नेतृत्व करून पाकिस्तानी सैनिकांना माघारी पाठवले .जाणून घेऊया परमवीर चक्र विजेत्या नायक जदुनाथ सिंह यांच्या बद्दल…

बालपण व देशसेवेचे स्वप्न

राठोड राजपूत नायक जदुनाथ सिंह यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशच्या शाहजहानपुर जिल्ह्यात झाला.त्यांचे वडील बिरबल सिंह राठोड हे एक गरीब शेतकरी होते. त्यांच्या ८ मुलांपैकी जदुनाथ हे तिसरे अपत्य होते.मोठे व एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती काहीसी जोमाचीच होती. जदुनाथ सिंह यांच्या बालमनात लहानपानापासूनच देशभक्तीची भावना होती. त्यांना वाटे आपण देशासाठी काहीतरी करावे.

जदुनाथ सिंह

जदुनाथ सिंह कुस्ती पण लढायचे आस पासच्या गावात त्यांना “कुस्ती चॅम्पियन  म्हणून ओळखत.  सन १९४१ रोजी त्यांचे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न पूर्ण झाले. जदुनाथ सिंह ब्रिटीश,भारतीय सैनिक म्हणून सैन्यात रुजू झाले.त्यावेळी त्यांचे वय २५ वर्ष होते. जदुनाथ सिंह हे राजपूत रेजिमेंट चा हिस्सा होते. सैन्यामध्ये सामील होणे ही जदुनाथ सिंह यांच्या साठी सौभाग्याची बाब होती.

दुसऱ्या महायुद्धात योगदान:

सैनिकी प्रशिक्षण  पूर्ण करून जदुनाथ सिंह हे पहिल्या बटालियन मध्ये झाले . १९४२ मध्ये “बर्मा” अभियानासाठी त्यांची नियुक्ती झाली व तेथे त्यांनी जपानिसोबत युद्ध केले.जदुनाथ सिंह यांनी दुसर्या महायुद्ध मध्ये आपल्या शौर्याचा सर्वांना परिचय करून दिला. दुसरे महायुद्ध संपताच त्यांना पदोन्नती देण्यात आली.त्यांना नायक या पदाने गौरवीत करण्यात

भारत पाकिस्तान युद्धातील पराक्रम:

१९४७ मध्ये जेंव्हा पाकिस्तानने आपले शशस्त्र  सैनिक काश्मीरला पाठवले त्यांची इच्छा पूर्ण काश्मीरवर कब्जा करण्याची होती.ही तेन्वाची गोष्ठ आहे जेंव्हा महाराजा हरीसिंह यांनी काश्मीर भारतात सामील करण्याची जाही घोषणा केली होती.अशावेळी पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरमध्ये अनेक जागी एकाच वेळी हल्ले केले,डिसेंबर मध्ये पाक सैनिकांनी झांगर येथे कब्जा केला,तेव्हा राजपूत बटालियनला त्या घुसखोरांना परत खदेडण्यासाठी व नौसेरा सेक्टरला सुरक्षित करण्याचा आदेश मिळाला. १ फेब्रुवारी १९४८ मध्ये ब्रिगेडीअर उस्मान यांच्या नेतृत्व मध्ये भारताच्या ५० सैनिकांनी नौशेरा वर हल्ला चढवला व पाक सैन्यांना वापस पाठवले.

आणी नौशेरावर भारतीय सैनिकांनी कब्जा केला.त्यामुळे नाराज झालेल्या पाक सैनिकांनी फेब्रुवारी मध्ये तेनधार येथे हल्ला केला व त्यावेळी तेथे नायक जदुनाथ सिंह आपल्या ९ सैनिकांसह हजार होते. त्यांनी गोळीबार करत एकवेळ दुश्मनांना हाकलून लावले. परंतु काही वेळातच पाकिस्तानी सैन्याने दुसर्यांदा हल्ला चढवला आता त्यांचे सैन्य व हत्यारे दुप्पट झाली होती,याउलट जदुनाथ सिंह यांचे ४ जवान जखमी झाले होते.

अशा वेळी जदुनाथ सिंह आपल्या ५ सैनिकांना प्रोत्साहन देत होते. अचानक ते सुधा गंभीर जखमी झाले ,जखमी होऊनही जदुनाथ  पूर्ण ताकतीने दुश्मनांना मारत होते हे बघून त्यांचे सोबती पण प्रोत्साहित होत होते. परंतु दुष्मनाच्या दोन गोळ्या एक डोक्यात व दुसरी छातीत वर्मी लागल्यामुळे जदुनाथ सिंह हे रणभूमीत लढताना विरगतीस प्राप्त   झाले.

जदुनाथ सिंह शहीद झाल्यावर त्यांना बॅकअप करणारी तुकडी आली आणि त्यांनी पाक सैनिकांना तीसर्यांदा पळून लावले. हे होऊ शकले केवळ जदुनाथ सिंह यांच्या कुशल नेतृत्वामुळेच…!

६ फेब्रुवारी १९४८ ला शहीद झालेल्या नायक जदुनाथ सिंह यांना भारतीय सेनेचा सर्वोच्य पुरस्कार “परमवीरचक्र”पण प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे भारत पाक च्या युद्धात पाकिस्तान पासून काश्मीरचे रक्षण करणाऱ्या महान सैनिकांमध्ये जदुनाथ सिंह हे पण समाविष्ठ झाले ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची पण आहुती दिली.


हेही वाचा:

केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top