इंग्रजांविरुद्ध बंड करणारी पहिला महिला राणी चेन्नमा होती..

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इंग्रजांविरुद्ध बंड करणारी पहिला महिला राणी चेन्नमा होती..


 

भारत देशात आजपर्यंत अनेक शूर,वीर,पराक्रमी राजा व महाराज्यांनी राज्य केले. त्यामध्ये  जास्त पुरुषांची संख्या आहे परंतु यास काही अपवादही आहेत. काही महिला राज्यकर्त्यांनी पण आपली कारकीर्द पराक्रमाने आणि शौर्याने गाजवली आहे. महिला शासक म्हणले की, आपणास झाशीची राणी लक्ष्मीबाई ,अहिल्याबाई होळकर,महाराणी ताराबाई यांसारख्या अनेक महिला शासक आठवतात.

आज आपण जाणून घेऊया स्वातंत्र लढ्यात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या पहिल्या महिला शासक म्हणजेच  “राणी चेन्नम्मा “ यांच्याबद्दल. कित्तूर प्रांताची राज्यकर्ता म्हणून त्यांनी ब्रिटीशांशी लढा दिलाआणि  कर्नाटकातील लोकांच्या मनात लोकनायक बनल्या. त्यांच्या जीवना विषयी थोडी माहिती…

 

राणी चेन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी कर्नाटक राज्यातील काकुती या लहानश्या गावी झाला.त्यांनी लहापनीच मुलांप्रमाणे तिरंदाजी,घुडस्वारी,तलवारबाजी यांसारखे युद्ध प्रशिक्षण घेतले. त्यांच्या याच कौशल्यामुळे त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

पुढे चालून वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह कित्तूर प्रांताचा शासक मल्लसर्जा देसाई यांच्या सोबत झाला.राणी चेन्नम्मायांचे वैवाहिक जीवन हे निराशाजनकच राहिले कारण लवकरच १८१६ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.

एवढेच नाही तर त्यांच्या लग्नामुळे एक मुलगा झाला त्यानेही १८२४ मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्या एकट्याच पडल्या राणी चेन्नम्मा यांनी शिवलींगाप्पा नावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि सिंहासनावर वारस म्हणून बसवले.

राणी चेन्नम्मा: ब्रिटीशांच्या विरोधात लढा

ब्रिटीशांनी सर्व मूळ राज्यात लॅप्सचा सिद्धांत लावला होता. यामुळे शासकाना स्वतःची मुले नसल्यास त्यांना दत्तक मुळे घेता येत नव्हती, अथवा तसी परवानगी नव्हती. त्यामुळे राणी चेन्नम्मा  यांचे साम्राज्य आपोआप ब्रिटीश साम्राज्यात सामील झाले.

किटूर हे राज्य धारवांडचे जिल्हा प्रभारी श्री. ठाकरे यांच्या कारभारात आले. श्री. चॅप्लीन हे या प्रांताचे आयुक्त होते. या दोघांनीही नवीन शासक व कारभारी यांना ओळखले  नाही आणि  कित्तूरला ब्रिटीश राजवट स्वीकारावी लागली.

याची माहिती मिळताच राणी चेन्नम्मा यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीचे लेफ्टनंट गव्हर्नर माउंटस्टुअर्ट  एल्फिन्स्टन  यांना पत्र लिहले. तथापी त्यांनी त्यांची विनंती नाकारली. आणि ब्रिटीशांनी कित्तूरवर दागिने जप्त करण्यसाठी मद्रास नेटिव्ह हाॅर्स तोफखान्यातील २०,००० पेक्षा जास्त सैनिकांसह  हल्ला चढवला.

 

राणी चेन्नम्मा यांनी सुरवातीला युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी त्यांना युद्ध करावेच लागले. १२ दिवस या शूर राणीने आणि त्यांच्या वीर सैनिकांनी  त्यांच्या किल्ल्याचा बचाव केला. परंतु आपल्या  देशात सामान्य असल्यासारखे काही गद्दारांनी त्यांच्या तोफांमध्ये शेन,आणि चिखल मिसळला.

त्यामुळे त्यांचा पराभव झाला. सन १८२४ मध्ये त्यांना कैदी बनवून बाईल होंगलाच्या किल्ल्यात अजीवन ठेवण्यात आले. शेवटी २१ फेब्रुवारी १८२९ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी चेन्नम्मा  यांनी मरेपर्यंत त्यांचे दिवस पवित्र धर्मग्रंथ वाचण्यात आणि पूजापाठ करण्यात घालवले.

चेन्नमा

राणी चेन्नम्मा यांना ब्रिटीशांच्या विरोधातील युध्द भलेही जिंकता आले नाही परंतु त्यांनी आपले नाव कार्नाटकातील अनेक शूरवीरांच्या यादीमध्ये सामील केले. कर्नाटकात त्यांना शौर्याची मूर्ती मानले जाते. स्वातंत्र चळवळीदरम्यान ब्रिटीश विरोधाच्या बहाद्दर कामगिरीमुळे त्यांच्या जीवनावर आधारित गाणे,कथा,नाटके ,लोकगीते प्रसिद्ध आहेत.

 

११ सप्टेंबर २००७ रोजी नवी दिल्लीतील संसद भवन आवारात कित्तूर राणी चेन्नम्मा यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. ब्रिटीशांच्या विरोधात लढणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शासक असलेल्या राणीला ही योग्य श्रद्धांजली आहे.

तसेच त्यांच्या नावावर रोज बंगळूर ते कोल्हापूर चालणारी रेल्वे “चेन्नम्मा एक्स्प्रेस”  ही आहे. त्यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट “कित्तूर चेन्नम्मा” बनवला आहे.  आज कर्नाटकातील अनेक प्रमुख भागांमध्ये राणी चेन्नम्मा यांच्या नावने चौक व  त्यांचे पुतळे  बसवण्यात आलेले आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top