7 कारण ज्यांच्यामुळे तुम्ही मार्वलचा नवीन चित्रपट ‘थॉर- लव्ह & थंडर’ पाहायलाच पाहिजेत..
मार्वल सिनेमाटीक युनिव्हर्सचा नवीन सिनेमा आज भारतात प्रदर्शित झाला. तसं तर मार्वल्सने भारतात गेल्या अनेक वर्षापासून आपले जबरे चाहते निर्मान करून ठेवलत. भारतातील अनेक लोक हे मार्वल्सच्या येणाऱ्या चित्रपटांची वाट पाहत असतातच.
हल्ली तर मार्वल्सचा नवीन चित्रपट आला की भारतीय लोक त्याच्यावर तुटून पडतात. थॉर ,आयरन मॅन,डॉक्टर स्ट्रेंज, वांडा, व्हिजन,थोनस,अश्या अनेक केरेकटरना मार्वल्सनी लोकांच्या मनात स्थान निर्माण करून दिलंय. आती यातील काही पात्र जरी युनिवर्समधून संपली असली तरीही लोक त्यांचे चाहते राहणारच.
असो. विषय सुरुय थॉर लव्ह & थंडरचा …. स्टोरी, कन्सेप्ट आणि इतर गोष्टी सांगून मी स्पोयलर देणार नाय, नाहीतर मग तुमचा चित्रपट पाहून काय फायदा?.. आज आपण फक्त चित्रपट का पाहावा याची कारण जाणून घेणार आहोत. ती ७ कारण जाणून तुम्ही ठरवा की थॉरला चित्रपटगृहात जाऊन भेटायचं की ओटीटीवर येईपर्यंत वाट पहायची…
तर नंबर एकवर आहे ते कारण म्हणजे थॉर स्वतः..
जर तुम्ही मार्वल्सच्या स्टारपैकी थॉरचे ‘जबरा फेंस’ असाल तर तुम्ही लगेच तिकिट बुक करायला घ्या.कारण थोर हे एकमात्र कारण पुरेस आहे हा चित्रपट पाहण्यासाठी.. हॉलीवूडचा स्टार अभिनेता असलेल्या क्रिस हेम्सवर्थने अनेक चित्रपटात काम केलं. पण तो खऱ्या अर्थाने अमेरिकेबाहेरही गाजला तो थॉरच्या रुपात. थोरच्या फेन फोलोविंगचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता ती मार्वल सिनेमाटीक युनिव्हर्स मध्ये थॉर एकमेव असा सुपरहिरो आहे ज्यावर सेपरेट असे 4 पार्ट बनलेत.
म्हणूनच थॉर तुमचा आवडता सुपरहिरो असेल तर, आधी तिकिट बुक करा आणि थेटराकड निघा…
दुसर कारण म्हणजे अभिनेता क्रिश्चियन बेल.तसं पाहिलं तर बेलचा मार्वल्स सोबत हा पहिलाच प्रोजेक्ट. आणि बहुधा आखरीही.. याधीही क्रिश्चियन बेल बॅटमैन बिगेन्स (2005), द डार्क नाईट (2008) और द डार्क नाईट राइसेस (2012) या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांचे मन जिंकलंय. बर मार्वल मधील इतर व्हिलनच्याबरोबर तुलना करता तो थोडासा कमकुवत जरूर वाटतो. पण पहिल्यांदाच त्याच्या रूपाने मार्वल्सने व्हिलन म्हणून एक अभिनेता उभा केलाय. तसं बाकीच्या चित्रपटात पाहिलं तर अधिकांश व्हिलन हे पडद्यामागून अभिनेत्याच्यासोबत केलेल्या Vfx मुळे जास्त खतरनाक दिसायचे.
पण या इथ थोडसं वेगळपण निर्मात्यांनी वापरलंय. कुठलाही vfx न वापरून केलेला व्हिलन आपल्याला भयानक ‘गोर द गॉड बुचर’च्या रूपाने पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
३)VFX:
आता vfx हा मार्वल्सच्या चित्रपटांची खरी ओळख बनत चाललाय. एका ग्रीन कपड्यावर अर्ध्याच्यावर चित्रपट शूट करून त्याला vfxच्या मदतीन एकदम एक्स्ट्राऑर्डनरी चित्रपट बनवने यात आता मार्वलला हातखंडा आलाय.इतर चित्रपटाप्रमाणेच थोर -लव्ह & थंडरचे VFX आणि व्हिज्युयल्स दमदार असणार यात काही वादच नाही, म्हणूनच स्पेशल हॉलीवूडVFXचा आनंद घ्यायचाय तर त्यासाठी थेटरचं गाठाव लागेल. कारण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आहे घरी बसून ओटीटीसाठी तर नक्कीच नाहीये..
४)सुपर डुपर धमाल दाखवणारा ट्रेलर..
जर तुम्ही थॉर लव्ह & थंडरचा ट्रेलर पहिला असेल तर कदाचित तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे, थॉरच्या बालपणातील एक सीन यात दाखवला गेला आहे. बर एवढचं नाही तर एंडगेम नंतर थोरचं बदललेल जीवन + शक्यता अशीही आहे की कदाचित थॉरच्या काही लहानपनीच्या गोष्टीही शूट करण्यात आल्या असाव्या आणि त्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील.. म्हणून ट्रेलर पाहता चित्रपट पाहावा असं तुम्हाला नक्कीच वाटेल..
५) थॉर आणि जेन फोस्टरची केमिस्ट्री.
थोर लव्ह & थंडर या नावावरूनच आपल्याला अंदाज येतोय की चित्रपटात जेन फोस्टर आणि थोर यांच्या प्रेम कहाणीचा एक पार्ट तर असणारेच. थोर रेगनारोक मध्ये आपल्याला त्यांचा प्रेमाचा एक सीन पाहायला मिळाला होता. पण बहुधा या चित्रपटात दोघांच्या केमिस्ट्रीवर जास्त भर देण्यात आला असावा. म्हणूनच हा चित्रपट थोरच्या चाहत्यांसाठी थोडासा वेगळाही होऊ शकतो..कारण एरवी एक्शन आणि हाणामारीमध्ये गुंतलेला असणारा थोर या वेळी प्रेमाच्या नावेतून प्रवास करतांना ही दिसू शकतो..
६) जेन फोस्टर ..
तसं पाहिलं तर मार्वलच्या चाहत्यांना हा नावाची आधीच ओळख झालीय. थोर सिरिच्या मागच्या सर्वच पार्टमध्ये जेनला स्क्रीनटाइम अतिशय कमी देण्यात आला होता. सध्या मार्वलमध्ये हे पात्र हॉलीवूड अभिनेत्री नताली पोर्टमेन निभावत आहे. थोर लव्ह & थंडर च्या निमिताने तरी तिला जास्तवेळ स्क्रीन मिळेल हीच आशा आहे. शिवाय ट्रेलरमध्ये दाखवलेल्या एका सीनमध्ये ती लेडी थोरच्या रुपात दिसतेय. कदाचित तिच्या रूपाने मार्वल नवीन सुपरहिरो आणि तिची श्रुंकला निर्मितीचा विचारही करत असावा, अर्थात अशी फक्त शक्यता आहे. कारण अगोदरच मिस. मार्वल्स ही सिरीज आपण पाहतोयचं. म्हणूनच कदाचित मार्वलच्या येणाऱ्य प्रोजेक्टमध्ये जेन फोस्टर लीड सुपरहिरोही असू शकते..
तर ही होती काही कारणे ज्यामुळे आम्हाला तरी हे पाहता चित्रपट पाहावा असं वाटतंय. आता तुम्ही वाचा विचार करा आणि ठरवा की बेस्ट 3D एकसपिरीयंससोबत हा चित्रपट पहायचा की ओटीटीवर येईपर्यंत वाट पहायची…
हेही वाचा:
केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..