दारूंच्या जगातील बिग ब्रदर असलेल्या पटियाला पेगने प्रसिद्ध व्हायच्या आधीच आयरिश पोलो संघाचा माज मोडला होता..
बॉलीवूड चित्रपटांमध्ये एका दारूच्या पेगचे नाव नेहमी घेतलं जात. दारूशी संबंधित हे भारतातील अतिशय प्रसिद्ध पेय आहे. या ड्रिंकचे नाव दुसरे काही नसून ‘पटियाला पेग’ आहे. मद्यपान करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पटियाला पेगचे नाव बहुतेकांनी ऐकले असेल, पण हे नाव कसे पडले याची कथा सर्वांनाच ठाऊक नाही.
पटियाला पेग ही बॉलिवूडची नाही तर पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांची भेट मानली जाते. इतकेच नाही तर खेळाडूंना पहिल्यांदा त्यांनी हा पेग दिला होता जे पिऊन खेळाडू ही पार तराट झाले होते.
याच पटियाला पेगची निर्मिती कशी झाली आणि तो प्रसिद्ध कसा झाला याचा इतिहासची तेवढाच रंजकदार आहे. चाल तर मग जाणून घेऊया पाटीयाला पेगचा हा इतिहास..
पटियाला पेगचा शोध लागला तेव्हा भारताच्या गुलामगिरीचा काळ होता. इंग्रजांची सत्ता भारतावर होती आणि त्यांनी लोकांच्या जीवनपद्धतीवर अनेक बंधने घातली होती.पण तरीही पंजाबमध्ये पटियालाचा एक राजा होता ज्याचे विलासी जीवन इंग्रजांसमोर कधीही थांबले नाही. त्यांचे नाव होत महाराजा भूपिंदर सिंग.
हा तोच राजा आहे ज्यांना स्वतः हिटलरने कार गिफ्ट केली होती. शिवाय त्यानी स्वतःसाठी एक वेगळा असा नग्नमहालदेखील बनवून घेतला होता ज्यात ते फक्त नग्न स्त्रियांनाच प्रवेश द्यायचा. असो हा झाला त्यांच्या ऐशो-आरामाचा विषय तो नंतर कधी तरी पूर्णपणे तुम्हाला आम्ही सांगूच. विषय आहे पटियाला पेगचा तर विषयावर येऊया..
महाराजा भूपिंदरसिंग हे भारतीयांपासून ब्रिटिशांपर्यंत त्यांच्या विलासी जीवनासाठी प्रसिद्ध होते. महाराजा भूपिंदर यांच्याकडे महागड्या गाड्या, स्टायलिश कपडे, अनमोल दागिने आणि 300 पेक्षा जास्त सुंदर राण्या होत्या. एवढेच नाही तर भूपिंदर सिंगला खेळण्याचीही खूप आवड होती. असे मानले जाते की तो खूप पोलो खेळत असे आणि त्यांच्याकडे शीख योद्ध्यांचा समावेश असलेली पोलो टीम देखील होती.
ही काही सामान्य पोलो टीम नव्हती. त्यात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वतःची वेगळी अशी ओळख होती. जेव्हा हा संघ मैदानात उतरायचा तेव्हा संपूर्ण भारतातून दुसरा कोणताही पोलो संघ त्यांच्यापुढे उभा राहू शकत नव्हता. त्या काळात भूपिंदर सिंग वेगळ्या प्रकारचा पोलो खेळण्यासाठी ओळखला जात असे.
त्या खेळाचे नाव होते ‘स्कल पेगिंग’.
हेही वाचा:दाक्षिणात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..
भूपिंदर सिंगची टीम त्यांच्या मृत शत्रूंच्या डोक्याचा सांगाडा घेऊन हा खेळ खेळायची! शत्रूचे डोके जमिनीवर ठेवून नंतर ते उचलण्याचा खेळ खेळला जायचा. त्यामुळे त्यांच्या संघाचे नावही सर्वत्र पसरले होते. याची खबर आयरिश पोलो टीमला लागली. भूपिंदरसिंगच्या संघाबद्दल ऐकल्यावर त्यांना वाटले की त्यांच्याशी सामना होईल.
यानंतर थोड्याच वेळात भूपिंदर सिंगला पटियाला येथे आयरिश संघासोबत मैत्रीपूर्ण-पोलो सामना खेळण्याचे आमंत्रण मिळाले. भूपिंदर सिंगने जास्त विचार न करता आयरिश संघाला भारतात येण्यास सांगितले.
तसा आयरिश संघ वाईन पिण्यात सर्वांत बहाद्दर.. संघच नाही तर संपूर्ण लोकच जास्त माल मारण्यात पटाईत होते. महाराजा भूपिंदर सिंग यांनी स्पर्धेला होकार देताच सर्वत्र चर्चा सुरू झाल्या. याआधी आयरिश संघ कोणीही पाहिला नव्हता. त्यांचा खेळ किती चांगला होता हे कोणालाच माहीत नव्हते.
पण लोक एवढ नक्की ऐकून होते की त्यांच्यासारखा पोलो संघ दुसरा कोणी नाही. प्रत्येकजण त्यांचे लांब आणि प्रचंड शरीर असलेल्या आयरिश खेळाडूंना घाबरत होता. मात्र, महाराजा भूपिंदर सिंग यांना कोणाचीच भीती वाटत नव्हती. तो फक्त आयरिश संघ पतियाळा येथील आपल्या राजवाड्यात येण्याची वाट पाहत होता.
काही दिवसातच आयरिशचा संघ भूपिंदर सिंगच्या राजवाड्यात पोहोचला तेथे त्यांना शाही पाहुण्यांप्रमाणे ठेवण्यात आले. त्याकाळी भूपिंदर सिंग यांच्या राजवाड्यात रोज रात्री मेळावा भरत असे. सगळ्यांच्या हातात हात देऊन तेथे ते पाहुण्यांचे मनोरंजन करण्याची सोय करायचे. त्याच मेळाव्यात त्या दिवशी आयरिश संघाचे खेळाडू मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्या काळात आयरिश खेळाडूंची एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती ती म्हणजे रात्रभर कितीही दारू,वाईन पिली तरीही ते सकाळी मात्र वेळेवर उठायचेच..अशी कोणतीही दारू नव्हती जी त्यांना सकाळी उठण्यापासून थांबवू शकली.
हे ऐकून जमलेल्या लोकांना असे वाटू लागले की प्रत्यक्षात आयरिशपेक्षा जास्त कोणी पिऊ शकत नाही. इतकंच नाही तर यानंतर भूपिंदर सिंगच्या अनेक खेळाडूंनी आयरिशकडून सामना हरण्याचा विचार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांना वाटू लागले की आयरिश खेळाडू खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांना पराभूत करणे अशक्य आहे. भूपिंदर सिंग यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना स्वतःचा अपमान वाटला. ते गोरे खेळाडू कितीही दारू सहन करू शकतील हे मान्य करायला ते तयार नव्हते.
थोडा विचार केल्यानंतर भूपिंदर सिंग आले आणि त्याने आयरिश खेळाडूंना नवीन पेय देऊ केले.
या पेयाचे नाव अद्यापठरलं नव्हत. त्याचा आकार इतर कोणत्याही पेयापेक्षा दुप्पट होता. यानंतर आयरिश खेळाडूंनी आपली ताकद दाखवण्यासाठी काहीही विचार न करता दारू पिण्यास सुरुवात केली. त्या रात्री आयरिश खेळाडूंनी इतके मद्यपान केले की सकाळी उठल्यावर त्यांना भानच राहिले नाही, असे म्हटले जाते. दारू त्यांच्या शरीरात अशा प्रकारे घुसली होती की त्यांना निट स्वतःला सावरता ही येत नवते.
हेही वाचा: राजा मानसिंगच्या जयगड किल्ल्यातील खजिन्याचे पुढ काय झालं? हे आजही कोणालाच माहिती नाहीये..
आयरिश संघ इतका नशेत होता की खेळण्याची हिंमतही होत नव्हती. मात्र, आपली इज्जत वाचवण्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही किंमतीला खेळावे लागले. आयरिश संघाने आपली स्थिती थोडी सुधारली आणि पोलोचा सामना खेळण्यासाठी स्वतःला तयार केले. मात्र, दुसरीकडे त्यांची प्रकृती कशी आहे हे त्यांनाच माहीत होत.
काही वेळातच आयरिश संघ आणि महाराजा भूपिंदर सिंग यांचा संघ मैदानावर पोहोचला. मैत्रीपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने होते, मात्र या मैत्रीपूर्ण सामन्यात दोघांचीही इज्जत पणाला लागली होती.
सामना सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच भूपिंदर सिंगचा संघ आयरिश संघापेक्षा पुढे होता. आयरिश संघाला स्वतःला सांभाळता आले नाही. शेवटी कायहोईल? याची आयरिश संघाला भीती वाटत होती.
महाराजा भूपिंदर सिंग यांच्या संघाने त्यांचा पराभव केला, अत्यंत वाईट पद्धतीने! आयरिश संघाचा हा पराभव थेट हृदयाला भिडला.ते एवढ्या वाईट पद्धतीने हरले यावर त्यांचाही विश्वास बसत नव्हता.
यानंतर त्यांनी महाराजा भूपिंदर सिंग यांच्यावर आरोप केला केला होता की , महाराजांनी मुद्दाम त्यांना रात्री मोठमोठे पेग दिले,ज्यामुळे त्यांना सकाळी होश आला नाही. प्रत्युत्तरात महाराजा भूपिंदरसिंग म्हणाले, होते होय, आमचे पेग हे मोठेच असतात. त्यानंतर भूपिंदर सिंग यांना कोणीही काहीही बोलले नाही.
त्या दिवसापासून तो पेग ‘पटियाला पेग’ नावाने सर्वत्र ओळखला जाऊ लागला. यानंतर सर्वांना समजले की पटियाला पेग हे असे पेय आहे, जे फार कमी लोक पचवू शकतात. त्या दिवसापासून मोकार दारू पिणारा ही पटियाला पेगला थोडासा विचर करूनच पिऊ लागला..
आज पटियाला पेगचे नाव क्लबपासून गाण्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. तरुणांमध्ये तर हा पेग खूप प्रसिद्ध आहे. आता मात्र ठराविक प्रमाणात पटियाला पेग केले जाते. त्याचं प्रमाण कमी करून आता 120ml वर आणण्यात आलंय.
मात्र, इतर दारूच्या बाबतीती एवढ्या प्रमाणात पेग पिणे ही मोठी गोष्ट मानली जाते. फार कमी लोक असे आहेत जे हा पेग पितात आणि अगदी कमी लोक ते सहन करू शकतात. पटियाला पेगची ही कथा तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..